सप्तचिरंजीव कोण त्यामागील रहस्य ?
*जय हरी माऊली हो,* या अल्पबुद्धीला गुरूकृपेने मिळालेले ज्ञान आपल्यासमोर मांडले आहे. काही चुकल्यास जाणीव करून द्यावे. 😇🙏🏻 *सप्तचिरंजीव कोण आणि त्यामागील रहस्य ?* _*" सत नमो आदेश गुरुजी को आदेश, "*_ *अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमांश्च बिभीषणः।* *कृपः परशुरामश्चैव सप्तेते चिरंजीविनः॥* *सप्तचिरंजीव :-* १) अश्वत्थामा २) बली ३) बिभीषण ४) परशुराम ५) व्यास ऋषी ६) कृपाचार्य ७) हनुमान(हनुमंतराय) सनातन धर्मामध्ये अनेक उत्तम वेळा जे काही श्लोक सांगितले गेले ते सांकेतिक असतात.त्याच्यातुन आपल्या नावे माहिती झाली त्यातून संकेत माहिती झाले. त्या नावांच्या सांगण्यामागे काही *'गूढ'* अर्थ लपलेला असतो. म्हणून सनातन धर्मामध्ये जास्तीत जास्त वेळा सांकेतिक भाषा मिळते. ती समजून घेण्यासाठी आपल्याला संत संगतीत राहणे गरजेचे आहे. *सप्तचिरंजीव यामागील रहस्य:-* १) *अश्वत्थामा:-* महाभारतातील द्रोणाचार्य यांचा पुत्र पण हा चिरंजीव *शापित आत्मा* म्हणून चिरंजीव आहे. याला भगवान श्रीकृष्णाचा शाप आहे की,तुला मृत्यू मिळणार नाही. मग हा चिरंजीव कसा तर *अस्वस्थ आत्मा* ह...