सप्तचिरंजीव कोण त्यामागील रहस्य ?

 *जय हरी माऊली हो,*

  

   या अल्पबुद्धीला गुरूकृपेने मिळालेले ज्ञान आपल्यासमोर मांडले आहे. काही चुकल्यास जाणीव करून द्यावे. 😇🙏🏻


*सप्तचिरंजीव कोण आणि त्यामागील रहस्य ?*


 _*" सत नमो आदेश गुरुजी को आदेश, "*_


*अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमांश्च बिभीषणः।*

*कृपः परशुरामश्चैव सप्तेते चिरंजीविनः॥*


*सप्तचिरंजीव :-*

१) अश्वत्थामा

२) बली

३) बिभीषण

४) परशुराम

५) व्यास ऋषी

६) कृपाचार्य

७) हनुमान(हनुमंतराय)


    सनातन धर्मामध्ये अनेक उत्तम वेळा जे काही श्लोक सांगितले गेले ते सांकेतिक असतात.त्याच्यातुन आपल्या नावे माहिती झाली त्यातून संकेत माहिती झाले. त्या नावांच्या सांगण्यामागे काही *'गूढ'* अर्थ लपलेला असतो. म्हणून सनातन धर्मामध्ये जास्तीत जास्त वेळा सांकेतिक भाषा मिळते. ती समजून घेण्यासाठी आपल्याला संत संगतीत राहणे गरजेचे आहे. 


*सप्तचिरंजीव यामागील रहस्य:-*


१) *अश्वत्थामा:-* महाभारतातील द्रोणाचार्य यांचा पुत्र पण हा चिरंजीव *शापित आत्मा* म्हणून चिरंजीव आहे. याला भगवान श्रीकृष्णाचा शाप आहे की,तुला मृत्यू मिळणार नाही. मग हा चिरंजीव कसा तर *अस्वस्थ आत्मा* हे अस्वस्थ आत्मा म्हणून चिरंजीवी असतात.काही जण बोलतात की नर्मदा परिक्रमेत अश्वत्थामा दिसला म्हणजे आपल्याला देव नाही भेटला तर एक शापित अस्वस्थ आत्मा भेटला असे समजावे. अस्वस्थ आत्मा हे काही ना काही इच्छे मुळे भटकत राहतात. म्हणून मुक्तीच्या पाठी लागावं मोक्षप्राप्ती मागे लागावं. अश्वत्थामा बनू नये. यामागे हा गूढ अर्थ आहे.


२) *बली:-* बलीराजा हा उत्तम राजा.परंतु उन्मतपणा (अहंकार) अंगी आलेल्यामुळे *भगवान विष्णू यांनी वामन अवतार* घेऊन तीन पायाची पृथ्वी मागितली आणि त्याने ती दिलीही. बलीराजा हा दानशूर पण होता. तर तो चिरंजीवी कसा ? भगवान वामनानी त्याला पाताळ लोकांत जागा दिली.आणि त्या पाताळ लोकांचे द्वारपाल म्हणून भगवान वामन आहेत. हे अनेकांना माहिती नाही. लोकांना फक्त बलीराजाचा घात केला हेच माहिती आहे. त्याला वरदान दिले की, तू कष्टकऱ्यांचा मजूर वर्गाचा प्रतिनिधित्व करणारा आहे. त्यामुळे तू बळीराजा मजूर वर्गाच्या कष्टकऱ्यांच्या रुपात चिरंजीवी राहतील. ही प्रवृत्ती जिवंत राहील. हा गूढ अर्थ आहे.


३) *बिभीषण:-* हा रावणाचा बंधु. परंतु राक्षस वंशातला असला तरी रामभक्तीकारक होता. आणि यांच्यात समजदारी होती. तर बिभीषणच्या मागचे चिरंजीवीचे काय गूढ असतील तर फार सुंदर अर्थ आहेत. बिभीषण म्हणजे असुरी वृत्ती राक्षस वंशातला असूनही भक्ती मार्गाला लागतात. आणि जन्मता राक्षस असूनही *संत* पदाला पोचतात. आता आपण म्हणाला बिभीषण संत तर होय, *बिभीषणाला रामचरित्रमानस मध्ये खुद प्रभू श्रीरामानी संत पद बहाल केले आहे.* आणि हनुमान यांच्या मध्यस्थीने बिभीषण लंकेचे राजे म्हणून बसवले आहेत. तर बिभीषण चिरंजीवी यामागील गूढ अर्थ असा की, असुरी,राक्षसी वृत्ती असणारे लोक भक्ती मार्गाला लागले तर ते सुध्दा चिरंजीवी होतात त्यांची कीर्ती चिरंजीवी असेल.


४) *परशुराम:-* भगवान विष्णूचा अवतार. प्रभु रामाच्या अगोदरचा. परशुराम कोण तर उत्तम योद्धा. भीष्मपितामह, कर्णाचे ते गुरू शोभतील. परशुराम म्हणजे काय तर तापसी,क्रोधी पण ते पराक्रमी असताना दानी, उत्तम राज्यकर्ते होते. ही वृत्ती असणारे लोक परशुराम या नावाने चिरंजीवी असतील.


५) *व्यासऋषी:-* *व्यास विशाल बुद्धे* संपूर्ण जग हे व्यासांच्या बुद्धीने व्यापले आहे. व्यासऋषी हे जगाचे गुरू म्हणजे संपूर्ण जग ते व्यासांचे उच्चशिष्ठ खात आहे. व्यास हे उत्तम कवी,उत्तम नाट्यकर्ते,उत्तम कला संपन्न होते. *भागवत कथेत व्यास यांचा असा उल्लेख येतो.* भगवान संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की,व्यासांच्या  मुळेच आम्हाला ज्ञान प्राप्त झाले.* तर व्यासांच्या नावाने चिरंजीवित्व मध्ये विशाल बुद्धी, काव्यत्व,ग्रंथकर्ते,संगीतकार,गायक आणि नर्तक हे सुध्दा चिरंजीवी असतील. व्यासांच्या नावाने या कला कधीही लुपत होणार नाही. यामागचा हा गूढ अर्थ आहे.


६) *कृपाचार्य:-* यांचं नाव *"श्रीमद भगवदगीतेत"* पहिल्या अध्यायात येते. *"कृपाचार्य म्हणजे सद्गुरु"* कृपा करणारे सद्गुरू कृपाचार्य या नावाने चिरंजीवित्व आहे. या जगात असुरी वृत्तीचे लोक असतील,अस्वस्थ आत्मे चिरंजीवी असतील,विचित्र व्यक्ती चिरंजीवी असतील, या सर्वांसोबत कृपा करणारे सद्गुरू सुध्दा चिरंजीवी असतील. ते वेगवेगळे शरीर धारण करून आपल्या संपर्कात येऊन कृपा करतील.असा सुंदर अर्थ निघतो. हे गूढ या चिरंजीवित्वात आहे.


७) *हनुमान(हनुमंतराय):-* *हनुमान हे सूक्ष्म देह असणारे बुद्धिमान, बलवान आणि तरी सुद्धा नम्र.* या जगामध्ये हनुमंतराय महाराजांच्या रूपाने अतिशय बलवान, अतिशय विद्वान साधक, सिद्ध योगी भक्त हे सुध्दा चिरंजीवी असतील. हनुमंतरायांच्या नावाप्रमाणेच सूक्ष्म देह धारण करणारे लोक क्षणात बारीक क्षणात मोठे क्षणात आपला देह बदलणारे, सिद्ध योगी, सर्व सिद्धी प्राप्त असणारे साधक हे चिरंजीवी असतील. सूक्ष्म देह धारण करणारे लोकही या जगात आहे ते अजून आपण पाहिले नाही म्हणून ते नाहीत असे होत नाही. सूक्ष्म देहाचे योगी बुद्धिमान, तेवढेच नम्र तेवढेच भक्तिमय असणारे लोक चिरंजीवी असतील या मागचा हा गूढ अर्थ आहे.


    माऊली हो, आज आपण सप्तचिरंजीवी याबद्दल माहिती आणि त्यामागील रहस्य गूढ अर्थ पाहिले आहे सनातन धर्मातील प्रत्येक ग्रंथ श्लोक यामध्ये असेच गूढ अर्थ असतात या सांकेतिक भाषेचा दर्जा आपल्याला प्राप्त करायचा असेल तर संत संगतीत राहणे आवश्यक आहे. सद्गुरू गुरू केले पाहिजे.गुरू केले पाहिजे.


*"गुरुविण नाही ज्ञान,गुरुविण नाही मोक्ष"*


*" नाथजी नवनाथ महाराज ८४ सिद्ध भली करे "*


*अलख निरंजन* 🔱📿

*आदेश* 🙏🏻🚩


[०८]

Comments

Popular posts from this blog

नवनाथांचा स्वभाव