Posts

सप्तचिरंजीव कोण त्यामागील रहस्य ?

 *जय हरी माऊली हो,*       या अल्पबुद्धीला गुरूकृपेने मिळालेले ज्ञान आपल्यासमोर मांडले आहे. काही चुकल्यास जाणीव करून द्यावे. 😇🙏🏻 *सप्तचिरंजीव कोण आणि त्यामागील रहस्य ?*  _*" सत नमो आदेश गुरुजी को आदेश, "*_ *अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमांश्च बिभीषणः।* *कृपः परशुरामश्चैव सप्तेते चिरंजीविनः॥* *सप्तचिरंजीव :-* १) अश्वत्थामा २) बली ३) बिभीषण ४) परशुराम ५) व्यास ऋषी ६) कृपाचार्य ७) हनुमान(हनुमंतराय)     सनातन धर्मामध्ये अनेक उत्तम वेळा जे काही श्लोक सांगितले गेले ते सांकेतिक असतात.त्याच्यातुन आपल्या नावे माहिती झाली त्यातून संकेत माहिती झाले. त्या नावांच्या सांगण्यामागे काही *'गूढ'* अर्थ लपलेला असतो. म्हणून सनातन धर्मामध्ये जास्तीत जास्त वेळा सांकेतिक भाषा मिळते. ती समजून घेण्यासाठी आपल्याला संत संगतीत राहणे गरजेचे आहे.  *सप्तचिरंजीव यामागील रहस्य:-* १) *अश्वत्थामा:-* महाभारतातील द्रोणाचार्य यांचा पुत्र पण हा चिरंजीव *शापित आत्मा* म्हणून चिरंजीव आहे. याला भगवान श्रीकृष्णाचा शाप आहे की,तुला मृत्यू मिळणार नाही. मग हा चिरंजीव कसा तर *अस्वस्थ आत्मा* ह...

नवनाथामध्ये गणपती व हनुमंत यांचे स्थान ?

 थोडक्यात पण महत्वाची माहिती    सत नमो आदेश गुरुजी को आदेश    नवनाथांमध्ये श्री गणपती महाराज यांचे स्थान कोणते ? तर महादेव पार्वतीमाता यांच्या शक्तीचे प्रतिक म्हणून नवनाथांमध्ये गणरायांचे स्थान श्री गजबली गजकंथडनाथजी महाराज हे आहे आणि रुद्राचा अवतार म्हणून ओळखणारे श्री हनुमंतराय यांचे स्थान ८४ सिद्धांमध्ये   गुरू गोरक्षनाथ महाराजांनी बिरबंकनाथ म्हणून स्थान दिले आहे.    त्यामुळे गणरायाला गजबली गजकंथडनाथ महाराज म्हणून आदेश करावा आणि हनुमंतराय यांना बिरबंकनाथ महाराज म्हणून आदेश करावा.   " नाथजी भली करे " माहिती आवडली तर नक्की सांगा  अलख निरंजन 🔱🚩 आदेश 🙏🏻📿
 जय हरी माऊली हो  अध्यात्म म्हणजे काय हे स्वानुभवातुन. नक्की वाचा🙏😊 ॐ ओंकार महा अवतार, नाथ जोगी बाजे शिंगी योग अचल शितल सारंगी शंख का ध्वनी काख मै झोली दास तुम्हारा अलक्ष योगी हात कटोरा बभुत जटाधारी कानों कुंडल नमो रूद्र बभुत धारी शिव का जोग निरंजन भारी ध्यान त्रिकाल त्रिलोक की जननी जगत के कैवार , नाथ तारणहारी नमो निर्विकार सिव नवनाथ चौऱ्यांसी दत्त जी का उपदेश गुरूनाथ श्री स्वामी यमुना तिर आदिनाथ गौरी मच्छ उदर मैं मच्छींदर ,सुना बीज अगोचरी विश्व के ग्यानी मच्छींद्रनाथ मुनी उपदेशित गोरख गोरख से गहनी हट् हट् जालिंदर कानिफा भर्तरी रेवन नागनाथ बोल सिद्ध चरपटी धर्म मीननाथ गोपीचंद नाथ सिद्ध अडबंग चौरंगी चौऱ्यांसी सिद्ध नमो नमो सिद्ध प्रतापी कली युग के संत बहु नवनाथ सिद्ध ग्यानी जगत उपदेशा अचलित गुरू वाणी अच्युत अनंत अनादि अविनासी  निराकार निर्गुण कंथा सहारी  नित्य पादुका सत् शिष्य अंगीकारी बोलत योगीदास नाथ आप परब्रम्ह की नगरी आप मे निरंजन अढल योगीराज स्वामी तर अध्यात्म म्हणजे काय ? अ ध् आ या त् म - अध्यात्म पहिला अ चा अर्थ पाहु - अडकलेला ध - धुम्ररूप म्हणजे जीव  आ -...

नवनाथांचा स्वभाव

 नवनाथांचा स्वभाव कसा आहे       सत नमो आदेश गुरुजी को आदेश      नवनाथ हे प्रेमळ आहे. सगळे नाथ दयाळू आहेत मायाळू आहे. अगदी आई सारखी माया करणारे आहेत. मग काही जण विचारतात की नाथ संप्रदाय कसा हवा तर नाथ संप्रदाय सुध्दा त्यांच्या आराध्या सारखे म्हणजेच नवनाथांसारखे दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराज दादागुरू जालिंदरनाथ महाराज दादागुरू कानिफनाथ महाराज ब्रम्हगुरू गोरक्षनाथ महाराज (ब्रम्हगुरू का तर सर्व योगात सिद्धीत असे विद्यमान म्हणून ब्रम्हगुरू) यांच्या सारखे दया करणारे आई सारखी माया करणारे आहेत. तर आपल्याला किंवा काही जणांना नवनाथांकडे पाहताना त्यांच्यातील सिद्धपणा अधिकारी पणाच दिसतो. पण आपल्याला काही गोष्टी नवनाथ भक्तीसार वाचून ऐकून सुध्दा कळत नाही आणि थोड्याक्यात नाथ कसे आहे ते आपण समजून घेऊ.        गुरू गोरक्षनाथ महाराज आणि दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराज हे प्रवासात असताना त्यांना वडे आवडले ही कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराजांनी गुरू गोरक्षनाथ महाराज यांची परीक्षा घेण्यासाठी वड्याचे कौतुक केले आणि बोले मला अजून व...

भक्ती शक्ती संगम २०२१

 वारकरी धारकरी संगम अर्थात भक्तीगंगा शक्तीगंगा संगम आज जेष्ठ वद्य नवमी करें भगव्या झेंड्यासवें पुर्ण वारी ! तसा म्लेंच्छनाशार्थ करणारं स्वारीं !! उभयतांमध्ये भेदं वाटें नं ज्याला ! मराठा म्हणावें अशा वाघराला !! महाराष्ट्राच्या कलेवरा मध्ये श्वास पेरला कोणी...? गलितग्रान्त महाराष्ट्राला घास भरवला कोणी...? राष्ट्रप्रेम, अभिमान, अस्मिता, चैतन्याची किमया महाराष्ट्राच्या अंतरात फूलवली कोणी...? कोण अशी ती विभूती ? शिवछत्रपती... शिवछत्रपती. ...राजा शिवछत्रपती आणि याच शिवरायांचे धारकरी, वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहतील, त्यांचे रक्षण करतील, देव देश आणि धर्मासाठी प्रसंगी प्राण देतील.असे माझे श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी वारकऱ्यांच्यात मिसळून एक झालेत एक झालेत. अशी ही भक्तिगंगा आणि शक्तिगंगा संगम आहे. - श्री संभाजीराव भिडे गुरुजी       देहू वरून प्रस्थान करणारी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी आळंदी वरून प्रस्थान करणारी संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांची पालखी जेष्ठ वद्य नवमीला आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आज्ञानेखाली संत जंगली महाराज मंदिर,पुणे य...