नवनाथांचा स्वभाव
नवनाथांचा स्वभाव कसा आहे
सत नमो आदेश गुरुजी को आदेश
नवनाथ हे प्रेमळ आहे. सगळे नाथ दयाळू आहेत मायाळू आहे. अगदी आई सारखी माया करणारे आहेत. मग काही जण विचारतात की नाथ संप्रदाय कसा हवा तर नाथ संप्रदाय सुध्दा त्यांच्या आराध्या सारखे म्हणजेच नवनाथांसारखे दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराज दादागुरू जालिंदरनाथ महाराज दादागुरू कानिफनाथ महाराज ब्रम्हगुरू गोरक्षनाथ महाराज (ब्रम्हगुरू का तर सर्व योगात सिद्धीत असे विद्यमान म्हणून ब्रम्हगुरू) यांच्या सारखे दया करणारे आई सारखी माया करणारे आहेत. तर आपल्याला किंवा काही जणांना नवनाथांकडे पाहताना त्यांच्यातील सिद्धपणा अधिकारी पणाच दिसतो. पण आपल्याला काही गोष्टी नवनाथ भक्तीसार वाचून ऐकून सुध्दा कळत नाही आणि थोड्याक्यात नाथ कसे आहे ते आपण समजून घेऊ.
गुरू गोरक्षनाथ महाराज आणि दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराज हे प्रवासात असताना त्यांना वडे आवडले ही कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराजांनी गुरू गोरक्षनाथ महाराज यांची परीक्षा घेण्यासाठी वड्याचे कौतुक केले आणि बोले मला अजून वडे खाण्याची इच्छा झाली आहे मला हे वडे अजून मिळतील का ? गुरू गोरक्षनाथ महाराजांनी गुरूबद्दल किंचित ही संशय न घेता पुन्हा त्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. आणि त्या बाईला त्या आईला म्हणाले मला वडे पाहिजे माझ्या गुरूंना वडे फार आवडले आहेत.(परीक्षेची वेळ आहे बघा नीतीने ही काही प्रारब्ध भोग कर्म हे बरोबर ठरवलेले असते.) त्या बाईने त्या आईने सुध्दा गुरू गोरक्षनाथ महाराजांना म्हंटल. "वा रे तू आणि तुझा गुरू साधू महाराज असून संन्यासी महाराज असून तुमचा वड्यामध्ये जीव लागला का? गुरू गोरक्षनाथ महाराज हे नाथपंथीय होते. ते चिडले नाहीत.(काही जणांना असा गैरसमज आहे की,आपण नाथपंथीय आहोत ते कोणावरही चिडू,रागु किंवा धमकी देऊ.) तर नाथ संप्रदाय बघा कसा आहे. गुरू गोरक्षनाथ महाराज कोठेही त्या बाईवर त्या आईवर चिडले नाहीत. गुरूंची इच्छा झाली आहे वडे खाण्याची आणि ते तुम्ही मला ते द्यावे. पुन्हा ती बाई ती आई उपहासात्मक बोली की, जर वडे एवढेच आवडले असतील आणि तू तुझ्या गुरूचा खरा चेला(शिष्य) अशील तर वड्याच्या बदल्यात दे तुझा डोळा काढून त्यावर गुरू गोरक्षनाथ महाराज डोळे वटारून न बघता त्या बाईकडे आईकडे अगदी निसिम भावनेने गुरूंच्या प्रती शरणागती(श्रद्धा) ठेवून आपला डोळा काढून दिला. ते कोठेही त्या बाईला त्या आईला शिव्या देत बसले नाहीत शाप देत बसले नाहीत. पण ते आपण देतो. आपण अधिकाऱ्यांने राहतो नाथ संप्रदाय हा रागीट बोलण्याच्या बाबतीत त्यानंतर नाथ संप्रदायच्या माणसाला घाबरायलाच पाहिजे असं आपण म्हणतो किंवा काही लोकांनी तसा गैरसमज करून घेतला आहे. ""आहो, आपला संप्रदाय असा आहे की, या गुरू गोरक्षनाथ महाराजांनी झाडावरून तुटलेली फळ आणि पान पुन्हा जोडून दिली आहे. नाथ संप्रदाय हा असा आहे की, जेव्हा धर्मनाथांच्या जन्माच्या अगोदर राणी मैनावतीच्या साठी जेव्हा परक्रीया(मृत देहाच्या) प्रवेश करायचा होता. तेव्हा दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराजांनी काशीच्या राजांच्या शरीरात प्रवेश केला आणि काही लोकांनी दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराज यांचं मूळ शरीरच गायब करून टाकलं. गुरू गोरक्षनाथ महाराजांना जेव्हा माहिती पडलं तेव्हा गुरू गोरक्षनाथ महाराजांनी तांडव नाही केला किंवा लोकांना शाप देत बसले नाहीत त्यांनी गुरुभक्तीच्या बळावर स्वताच्या योग सामर्थ्यांनी दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराजांच नष्ट केलेलं कलेवर शरीर पुनःश्च संघटित केलं.त्यामुळे सर्व कथा जर आपण नीट वाचल्या किंवा ऐकल्या तर आपल्या लक्षात येईल की, नाथ संप्रदाय हा गुंडगिरीचा संप्रदाय नाही. आणि खर सांगू का सत्याला प्राप्त केलेला आणि ज्ञानी व्यक्ती कसा असेल त्याची खूण काय असेल ओळखाच असेल तर ज्ञानी व्यक्ती हा सदैव आनंदी असतो देव पाहिलेला माणूस हा सदैव सुखी असतो. मग तो भुंकत नाही सतत भुंकन हे अज्ञानाच काम असत आणि ज्ञानी तो महावीर आहे तो सिंह आहे फक्त डरकाळी फोडत असतो.(माफ करा काही चुकीत बोलत असेल तर) त्या ज्ञानीला ओळखायचं असेल तर तो सदैव शांत असत त्यांच्या जिभेवर एक मधुरता असते आणि तो नेहमी नाथांचा नोकर म्हणूनच राहतो तो नेहमी गुरूंचा दास्यत्व स्विकारतो.
आता आमच्या आपल्या नाथ संप्रदायामध्ये गुरू गोरक्षनाथ महाराज हे प्रत्यक्ष शंकराचे भगवान आदिनाथांचे अवतार आहेत. पण तरी ते दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराजांचे दास्यत्व पत्करतात आणि सदैव गुरूंच्या आज्ञनेत राहतात. मग आपल काय झालं आहे. २/४ मंत्र शिकून चिमटे हातात घेऊन आम्ही लोकांना चिमटे का काढतोय. त्यामुळे "ज्याला अत्तराचा स्पर्श झाला आहे. तो जवळून गेला की त्यांचा सुगंध दळवळतो" मग भगवंताचा स्पर्श लाभलेला नाथांचा स्पर्श लाभलेला व्यक्ती आनंदाचा सुगंध का देऊ शकत नाही. त्यामुळे देव पाहिलेला व्यक्ती तो नेहमी सुखी असतो आणि तो दुसऱ्यांना सुद्धा सुख देत असतो तो घाबरवत नाही आणि नाथ संप्रदाय हा भक्तीश्रेष्ठ संप्रदाय आहे हा योग संप्रदाय आहे. त्यामुळे ज्या ज्या नाथांचे वर्णन नवनाथ भक्तीसार मध्ये वाचले असेल ऐकले असेल तर प्रत्येक नाथांनी १२ वर्ष तपश्चर्या केली आहे. ते काही एका दिवसात नाथ पदावर बसले नाहीत. तपश्चर्याने मनुष्य शांत होतो माणसाच्या मनात कैवल्य निर्माण होते. त्यामुळे तो स्वतः आदरपूर्ण असतो आणि दुसऱ्याला ही आदर देत असतो.(अजून काही गैरसमज नाथ संप्रदायाबद्दल आहे की हे लोक गरम डोक्याचे रागीट असतात.) नव्हे नव्हे खरा नाथ संप्रदायी हा संस्कारी आहे. त्याला त्याच्या बापानी दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराजांनी दादागुरू गोरक्षनाथ महाराजांनी दादागुरू जालिंदरनाथ महाराजांनी दादागुरू कानिफनाथ महाराजांनी त्याला संस्कार दिलेले असतील त्यामुळे तो छानच वागेल. तो सर्वांशी प्रेमाने वागेल आणि म्हणून एक सांगावेसे वाटे एखादे लेकरू चांगलं वागल नाही तर आपण म्हणतो आई वडीलाने संस्कार दिले नाही. त्यामुळे मीही जास्तीत जास्त चांगला वागण्याचा प्रयत्न करतो. कारण गुरू म्हणून मी नाथांना आवाज देतो. नव्हे नव्हे आपण नवनाथ भक्तीसार वाचला तर नाथांना अवश्य होत तिथेच त्यांनी सिद्धीचा वापर केला जिथे गरज तिथेच क्रोधाचा वापर केला. आपल्या मध्ये आणि नाथांमध्ये आपल्या मध्ये आणि साधकांमध्ये एवढाच फरक असतो. क्रोध आपल्याला चालवतो राग आपल्याला चालवतो. आपण म्हणतोच ना की मला राग आला की मला काही सुचत नाही. कारण रागाने मला तुमच्यावर नियंत्रण मिळवलेलं असते. संतांनी ज्ञानी लोकांच थोडं काम वेगळं असत. राग त्यांच्या नियंत्रणामध्ये असतो. त्यामुळे ते रागाचा वापर करून घेतात. राग त्यांचा वापर नाही करत. स्वभावाचा राग काही कामाचा नाही. त्यामुळे रागीट माणूस हा अर्ध्या हळदकुंडाने पिवळे आहेत असे समजावे. देव पाहिलेला माणूस शांत असतो. त्यामुळे खरा ज्ञानी ओळखण्याचे दोन संकेत आहे. त्यांच्या स्वभावात आणि त्यांच्या चेहऱ्यावर सदैव हास्य आणि आनंदी असतो. त्यामुळे चिडचिड करणारा दिसला की, त्यांच्यासाठी आपण नाथांकडून आशीर्वाद मागावे. नाथांनी त्याचा राग शांत करावा. ज्याला स्वतःच्या वाणीवर नियंत्रण नाही ज्याला देवतांमध्येच भेद दिसत असतात त्याला देव काही प्राप्त होणार नाही. त्यामुळे नाथ संप्रदाय काय आहे नवनाथ काय आहे. तर हे एका आईच लेकरावर प्रेम आहे. नवनाथ हे आपले आई वडील आहेत. ते अत्यंत दयाळू अत्यंत कृपाळू आहेत. त्यांना घाबरण्याची कोठेही गरज नाही. हा नाथांच्या नावाने जे धमक्या देत असतील त्यांच्यावर दया करा. कारण देव पाहिलेला माणूस हा नेहमी शांत असतो. नाथांकडे भरपूर प्रेमाचा साठा आहे ईथे प्रेम भक्ती मिळते. म्हणून नाथ हे प्रेमळच आहे त्यामुळे घाबरायची गरज नाही. गुरू तत्व नेहमी हेच सांगत असते त्यामुळे ज्यांनी अजून गुरू नाही केला आहे त्यांनी गुरू का करावाच
या अल्पशा बुद्धीला कळालेले नाथ आपल्या समोर शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला आणि मुळात नाथ हे शब्दात सांगता येतील असे नाहीच शब्दात सांगताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी.
🙏🏻🙏🏻
"गुरू नवनाथ महाराज भली करे"
|| ॐ नमः शिवाय ||
|| ॐ श्री गुरूदेव दत्त ||
|| ॐ चैतन्य गुरू नवनाथाय नमः ||
अलख निरंजन 🔱📿
आदेश 🙏🏻🚩
ॐ नमः शिवाय
ReplyDelete