जय हरी माऊली हो
अध्यात्म म्हणजे काय हे स्वानुभवातुन.
नक्की वाचा🙏😊
ॐ ओंकार महा अवतार, नाथ जोगी बाजे शिंगी योग अचल शितल सारंगी शंख का ध्वनी काख मै झोली दास तुम्हारा अलक्ष योगी हात कटोरा बभुत जटाधारी कानों कुंडल नमो रूद्र बभुत धारी शिव का जोग निरंजन भारी ध्यान त्रिकाल त्रिलोक की जननी जगत के कैवार , नाथ तारणहारी नमो निर्विकार सिव नवनाथ चौऱ्यांसी दत्त जी का उपदेश गुरूनाथ श्री स्वामी यमुना तिर आदिनाथ गौरी मच्छ उदर मैं मच्छींदर ,सुना बीज अगोचरी विश्व के ग्यानी मच्छींद्रनाथ मुनी उपदेशित गोरख गोरख से गहनी हट् हट् जालिंदर कानिफा भर्तरी रेवन नागनाथ बोल सिद्ध चरपटी धर्म मीननाथ गोपीचंद नाथ सिद्ध अडबंग चौरंगी चौऱ्यांसी सिद्ध नमो नमो सिद्ध प्रतापी कली युग के संत बहु नवनाथ सिद्ध ग्यानी जगत उपदेशा अचलित गुरू वाणी अच्युत अनंत अनादि अविनासी निराकार निर्गुण कंथा सहारी नित्य पादुका सत् शिष्य अंगीकारी बोलत योगीदास नाथ आप परब्रम्ह की नगरी आप मे निरंजन अढल योगीराज स्वामी
तर अध्यात्म म्हणजे काय ?
अ ध् आ या त् म - अध्यात्म
पहिला अ चा अर्थ पाहु - अडकलेला
ध - धुम्ररूप म्हणजे जीव
आ - आकळुन
या -या मधुन
त - तरण्यासाठी
म - मार्ग
ज्याचा अर्थ असा की मायेेमध्ये
अ - अडकलेल्या
ध - धुम्ररूप म्हणजे जीवाला
आ -आकळुन
या - या मधुन
त - तरण्यासाठी मिळालेला
म - मार्ग मिळतो ते अ ध्या त्म
*या भवसागरात अडकलेल्या जीवाला आकळुन या मधुन तरण्यासाठी ज्यातुन मार्ग मिळतो ,त्याला अध्यात्म म्हणतात.*
अध्यात्म कसे करतात ,तर याच उत्तर ही याच शब्दात आहे फक्त अध्यात्म या शब्दाला उलटे करा.
म -मन म्हणजे बुद्धी
त- तन म्हणजे शरीर
आ -आत्मा
या -यांना
ध -ध्यानावस्थेतुन
अ - अनादि रूप करा ,म्हणजेच देवाशी एकरूप करा.
म्हणजे अध्यात्म कसे करायचे तर मन ,तन ,आत्मा ,यांना त्या मुळ भगवंताचे ध्यान करून त्या अनादी असलेल्या ईश्वराशी एकरूप करा यालाच अध्यात्म करणे म्हणतात.
म्हणजेच नावातच गुढ आहे ते फक्त जाणले पाहिजे ,
ज्यातुन अडकलेला जीवाला मुक्त होण्याचा मार्ग मिळतो आणि तो कसा मिळतो हे ही यातच आहे ,फक्त ते सदगुरू कृपेने आम्ही पारखुन पाहिले आम्हाला समजले ,ही आता फक्त तुम्ही पारखुन आचरणात आणा.
पहिली गोष्ट हे अध्यात्म निस्वार्थाने करणारे सर्व दास असतात ,यात कोणीही लहान मोठे जास्त कमी नसते ,ओढ जर असेल तर सर्व सारखेच ,संताना कान नाक डोळे होते आपल्यालाही आहे ,मग फरक काय फरक हाच की त्यांनी भाव धरला होता ,आपण तो अढळ भाव धरत नाही म्हणुन आज आपण त्या अध्यात्मापासुन दुर आहोत.ते अध्यात्म करण्यासाठी अध्यात्माचे मुळ हे सदगुरूच आहेत ,
अध्यात्म म्हणजे ग्रंथ पुराण पोथी वाचने नव्हे तर सदगुरूंना शरण जाऊन ,या जीवाचा तन मनाचा आत्म्याचा आत्माराम करून आत्मोद्धार करणे म्हणजेच अध्यात्म समजणे आणि करणे होय ,अध्यात्म म्हणे त्याच अनादि ईश्वराशी एकरूप होणे होय.🙏🏻🙏🏻😊😊
चुकले असेल तर क्षमस्व ,परंतु सदरचे सर्व बोल हे अनुभवातील असुन कुठल्याही पुस्तकातील ग्रंथातील नाही , त्यामुळे चुकले तर मोठ्या मनाने या अज्ञान बालकास क्षमा करा .
जय गुरू नवनाथ महाराज भली करे
जय गुरूजी को आदेश
|| ॐ नमः शिवाय ||
|| ॐ श्री गुरूदेव दत्त ||
|| ॐ चैतन्य गुरू नवनाथाय नमः ||
अलख निरंजन 🔱📿
आदेश 🙏🏻🚩
Comments
Post a Comment