भक्ती शक्ती संगम २०२१
वारकरी धारकरी संगम अर्थात भक्तीगंगा शक्तीगंगा संगम
आज जेष्ठ वद्य नवमी
करें भगव्या झेंड्यासवें पुर्ण वारी !
तसा म्लेंच्छनाशार्थ करणारं स्वारीं !!
उभयतांमध्ये भेदं वाटें नं ज्याला !
मराठा म्हणावें अशा वाघराला !!
महाराष्ट्राच्या कलेवरा मध्ये श्वास पेरला कोणी...?
गलितग्रान्त महाराष्ट्राला घास भरवला कोणी...?
राष्ट्रप्रेम, अभिमान, अस्मिता, चैतन्याची किमया
महाराष्ट्राच्या अंतरात फूलवली कोणी...?
कोण अशी ती विभूती ?
शिवछत्रपती... शिवछत्रपती. ...राजा शिवछत्रपती
आणि याच शिवरायांचे धारकरी, वारकऱ्यांच्या पाठीशी
खंबीर पणे उभे राहतील, त्यांचे रक्षण करतील, देव देश आणि धर्मासाठी प्रसंगी प्राण देतील.असे माझे श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी वारकऱ्यांच्यात मिसळून एक झालेत एक झालेत.
अशी ही भक्तिगंगा आणि शक्तिगंगा संगम आहे.
- श्री संभाजीराव भिडे गुरुजी
देहू वरून प्रस्थान करणारी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी आळंदी वरून प्रस्थान करणारी संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांची पालखी जेष्ठ वद्य नवमीला आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आज्ञानेखाली संत जंगली महाराज मंदिर,पुणे येथून प्रस्थान होणारे पुण्यश्लोक श्री शिवछत्रपती पुण्यश्लोक धर्मवीर श्री शंभूछत्रपती यांचे लाखो धारकरी वारकऱ्यांच्या तालात गुंग होऊन माऊली तुकाराम महाराज सोपान महाराज तुकडोजी महाराज मुक्ताई अनेक संतांच्या नावाने मग्न होऊन पुण्यात होणाऱ्या या सोहळ्याचा संगमाचा तो क्षण आत्मसात करून वर्षभर आपल्या हृदयात घेरून ठेवतात असा हा भक्ती शक्ती संगम परंतू या महामारी मुळे गेली २ वर्ष हा संगम होत नाही आहे हा संगम किती महत्वाचा आहे हे फक्त एक वारकरी आणि धारकरीच जाणू शकतो. पंढरीच्या पांडुरंगा तुझ्याकडे एकच मागणं आहे माझ्या सावळ्या विठ्ठला ही आलेली महामारी लवकर संपव आणि आम्हा वारकरी धारकरी यांचे मिलन पुढील वर्षी घडवून आण.
म्हणे बाप माझा असे पंढरीत |
आई राहते नित्य तुळजापुरात ||
तयां दर्शनासाठी आतुरलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
अमित विकास पाटील
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,
अंबरनाथ तालुका जिल्हा ठाणे
८९८३३९०२३८
🚩वारकरी धारकरी संगमाची🚩
🚩भक्ती शक्ती संगमाची 🚩
!! राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळं !!
जय हरी विट्ठल खुपच छान
ReplyDeleteराम कृष्ण हरी
Delete